स्मार्टसिटीसाठी 'मायक्रोसॉफ्ट'ची मदत

पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेमध्ये आता जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टनं मदतीचा हात पुढे केलाय...  

Updated: Nov 6, 2015, 09:46 PM IST
स्मार्टसिटीसाठी 'मायक्रोसॉफ्ट'ची मदत  title=

मुंबई : पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेमध्ये आता जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टनं मदतीचा हात पुढे केलाय...  

कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नाडेला सध्या भारत दौ-यावर आहेत.. काल मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात नाडेला यांनी स्मार्ट सिटी योजनेत हातभार लावण्यासाठी तयारी दर्शवलीये. 

मायक्रोसॉफ्टच्या एझ्यूर अंतर्गत येत्या वर्षभरात 50 स्टार्ट अप्स सुरु करण्यात येणार असून देशात 50 स्मार्ट सिटींच्या उभारणीतही मायक्रोसॉफ्ट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.. राज्य सरकारच्या ५० डिजिटल व्हिलेज प्रकल्पातही मायक्रोसॉफ्टचं सहकार्य मिळणार आहे.

दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ४२ सरकारी सेवा ऑनलाईन झाल्याचं यावेळी सांगितलं... 

राज्य सरकारच्या सर्व सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. पुढील वर्षाअखेर 50 गावं स्मार्ट करण्याचं आपलं लक्ष असल्याचंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.