असहिष्णूताबाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये : मोदी

देशात असहिष्णूतेची भावना निर्माण झाल्याचे आरोप  होत आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी साहित्यिक, चित्रपटकर्मी, शास्त्रज्ञ यांनी आपले पुरस्कार परत केलेत. तसेच काँग्रेस आणि कम्युनिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवलेय. याला आज मोदी यांची प्रत्युत्तर दिलेय. असहिष्णूताबाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये, असे मोदी म्हणालेत.

PTI | Updated: Nov 2, 2015, 10:23 PM IST
असहिष्णूताबाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये : मोदी title=

पाटणा : देशात असहिष्णूतेची भावना निर्माण झाल्याचे आरोप  होत आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी साहित्यिक, चित्रपटकर्मी, शास्त्रज्ञ यांनी आपले पुरस्कार परत केलेत. तसेच काँग्रेस आणि कम्युनिष्ठ नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकेची झोड उठवलेय. याला आज मोदी यांची प्रत्युत्तर दिलेय. असहिष्णूताबाबत काँग्रेसने आम्हाला शिकवू नये, असे मोदी म्हणालेत.

मोदी सरकारवर सातत्याने असहिष्णूतेवरुन टीका होत आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीत प्रचार करताना भाजपची चांगलीच दमछाक झालेय. बिहार देशातील तिसऱ्या क्रंमकाचे मोठे राज्य आहे, बिहारचा विकास अजून झालेला नाही, राज्यातील अंतर्भागात भागात वीजेच्या समस्ये बरोबर आर्थिक स्थिती सुधारण्याच आव्हान आहेच. त्याचवेळी भाजपवर असहिष्णूतेबाबत जोरदार टीका होत आहे.

विरोधक देशातील असहिष्णुतेबद्दल भाजपाविरुद्ध एक धार्मिकतेच चित्र रंगवित आहेत, असे प्रतिआरोप मोदी यांनी बिहार येथील सभेत केला. असहिष्णूतेवरुन टीका करणा-या काँग्रेसवर पंतप्रधान मोदींनी आज पलटवार केलाय. शीखांच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या काँग्रेसने असहिष्णूतेवरुन भाषण देऊ नये, असे प्रत्युत्तर मोदींनी दिले आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.