Indian Team Head Coach: सध्या टीम इंडिया टी-20 वर्ल्डकपसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेली आहे. यावेळी काही खेळाडू येत्या एक ते दोन दिवसात रवाना होणार आहेत. टी-20 वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांचा कोचपदाचा कार्यकाळ संपणार आहे. अशातच बीसीसीआयने नवीन कोचसाठी अर्ज मागवले होते. तर या अर्जांमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते. यामध्ये राहुल द्रविडही या पदासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. दरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अर्जांमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्या नावाने अर्ज केले असल्याचं समोर आलं आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी, अमित शाह, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी यांच्या नावाने बोगस अर्ज दाखल आले आहेत. अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मुख्य प्रशिक्षकपदासाठी 3,000 हून अधिक अर्जदार मिळाले आहेत. मुख्य प्रशिक्षकपदासाठी 27 मेपर्यंत अर्ज करता येत होते, त्यामुळे आता ही मुदत संपुष्टात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला तेंडुलकर, धोनी, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि इतर माजी क्रिकेटपटूंच्या नावाने अनेक अर्ज आले. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांसारख्या राजकारण्यांचीही नावाचेही बोगस अर्ज मिळाले आहेत.
बीसीसीआयला यापूर्वीही बोगस अर्ज मिळाल्याचं समोर आलं होतं. 2022 मध्येही जेव्हा बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले होते, त्यावेळी त्याला सेलिब्रिटींच्या नावाने अनेक अर्ज प्राप्त झाले होते. यंदाच्या वेळी बीसीसीआयने इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज पाठवण्यास Google Forms चा वापर केला होता.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, “गेल्या वर्षीही बीसीसीआयला असाच प्रतिसाद मिळाला होता. या ठिकाणी अनेक फसवणूकीचे अर्ज प्राप्त झाले होते. यावेळीही तीच गोष्ट आहे. बीसीसीआय गुगल फॉर्मवर अर्ज मागवण्याचे कारण म्हणजे एका शीटमध्ये अर्जदारांची नावे तपासणं सोपं आहे.”