नवी दिल्ली : स्मृती इराणी आणि आनंदीबेन यांना न्याय देणारे देशाचे पंतप्रधान मोदी आपल्या पत्नीला न्याय कधी देणार? असा सवाल आता काँग्रेसनं उपस्थित केलाय.
'काँग्रेस नेते गुरूदास कामत यांना आता पंतप्रधान मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांचा पुळका आलाय. 'स्मृती इराणी आणि आनंदीबेन यांना वर आणलं जातंय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जसोदाबेन यांना मात्र त्यांच्या हक्कापासून जाणून-बुजून वंचित ठेवलं जातंय, असं का? असा सवाल गुरूदास कामत यांनी विचारलाय. यावेळी, त्यांनी मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींच्या मेरीटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
यावेळी, बेटी बचाव, महिला सुरक्षा हे मोदींचे कार्यक्रम म्हणजे निव्वळ भंपकपणा आहे, असाही आरोप गुरूदास कामत यांनी केलाय.
आनंदीबेन पटेल आणि स्मृती इराणी यांना सुरक्षा दिली जाते मात्र जशोदाबेन यांच्याकडे जाणून बुजून दूर्लक्ष कलं जातं. मोदी महिला संरक्षणाची भूमिका घेतात... हा सरळ सरळ भंपकपणा आहे... काँग्रेस सरकारच्या योजनाचं नाव बदलण्याचा कार्यक्रम सध्या भाजप सरकारकडून सुरू आहे, असंही कामत यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.