मोदींचे सोनिया, राहुल, केजरीवाल यांना योगदिनाचे निमंत्रण

 जागतिक योगदिनानिमित्त राजधानीतील राजपथ येथे आयोजित कार्यक्रमासाठी मोदी सरकारने कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केले आहे.  २१ जून रोजी योगदिन होत आहे.

PTI | Updated: Jun 3, 2015, 05:20 PM IST
मोदींचे सोनिया, राहुल, केजरीवाल यांना योगदिनाचे निमंत्रण title=

नवी दिल्ली :  जागतिक योगदिनानिमित्त राजधानीतील राजपथ येथे आयोजित कार्यक्रमासाठी मोदी सरकारने कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निमंत्रित केले आहे.  २१ जून रोजी योगदिन होत आहे.

केंद्र सरकारने या कार्यक्रमासाठी सर्व संसदीय सदस्यांनाही निमंत्रित केले आहे. यावेळी सर्व कॅबिनेट मंत्रीही उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे. याबाबत माहिती सांस्कृतिक मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. ते म्हणालेत, आम्ही योग दिनानिमित्त राजपथ येथे एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पोलिस, लहान मुले, लष्कर यांच्यासह जवळपास एक लाख जण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

जागतिक योगदिनाचा हा कार्यक्रम यशस्वीरितयिा पार पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष लक्ष देत आहेत. कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. 

मागील वर्षी डिसेंबरमध्ये संयुक्‍त राष्ट्राने २१जून हा दिवस जागतिक योगदिन म्हणून जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी योगाबाबतची विविध माहिती देणारी फेसबुकवर दररोज एक पोस्ट लिहिणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने कळविले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.