अटलबिहारी वाजपेयी, पं. मदन मोहन मालवीय यांना 'भारतरत्न' जाहीर

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न जाहीर होण्याची शक्यता आहे. याबाबत कोअर कमिटीची काल रात्री उशिरा बैठक झाली. यात यावर शिक्कमोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Updated: Dec 24, 2014, 01:08 PM IST
अटलबिहारी वाजपेयी, पं. मदन मोहन मालवीय यांना 'भारतरत्न' जाहीर title=

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे संस्थापक पंडित मदनमोहन मालवीय यांना मोदी सरकारनं 'भारतरत्न' देण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. याबाबत कोअर कमिटीची काल रात्री उशिरा बैठक झाली. यात यावर शिक्कमोर्तब झालं.  

उद्या, २५ डिसेंबरला अटलजींचा वाढदिवस आहे. यानिमित्त मोदी सरकार त्यांना बर्थ डे गिफ्ट देऊ इच्छितं. पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ डिसेंबरला मदनमोहन मालवीय यांच्या कर्मस्थळावर बीएचयूच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याआधीच भाहत सरकारनं नवी दिल्लीत या महान व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा केलीय.

मदन मोहन मालवीय यांचा जन्म २५ डिसेंबर १८६१ रोजी प्रयागमध्ये झाला होता. काशी हेच त्यांचं कर्मस्थळ राहीलं. याचमुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एका दिवसाच्या निमित्तानं काशीमध्ये उपस्थित राहतील. 

देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान आत्तापर्यंत ४३ जणांना मिळालाय. २५ डिसेंबर रोजी घोषणा झाली तर मदन मोहन मालवीय आणि अटलबिहारी वाजपेयी या पुरस्कारानं सन्मानित केले जाणारे ४४ वे आणि ४५ वे व्यक्ती ठरतील. भारतरत्न देण्याची व्यवस्था २ जानेवारी, १९५४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली होती. त्यावेळी, केवळ जिवंत व्यक्तींनाच हा सर्वोच्च सन्मान दिला जात होता. परंतु, १९५५ मध्ये मरणोत्तर सन्मान देण्याचंही निश्चित करण्यात आलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.