'आत्महत्येचा प्रयत्न' गुन्हा राहणार नाही?

‘आत्महत्येचा प्रयत्न’ गुन्ह्याच्या चौकटीतून बाहेर काढून टाकण्याची तयारी सरकारनं केलीय. यासाठी कलम 309 काढून टाकण्यात येऊ शकतो. 

Updated: Aug 6, 2014, 11:33 AM IST
'आत्महत्येचा प्रयत्न' गुन्हा राहणार नाही? title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : ‘आत्महत्येचा प्रयत्न’ गुन्ह्याच्या चौकटीतून बाहेर काढून टाकण्याची तयारी सरकारनं केलीय. यासाठी कलम 309 काढून टाकण्यात येऊ शकतो. 

सध्या, आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा ठरतो. या गुन्ह्यासाठी एका वर्षाची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे. 

गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी मंगळवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना लिखित स्वरुपात उत्तर देताना ही माहिती दिलीय. विधी आयोगानं ‘ह्युमनायजेशन अँन्ड डिक्रिमनायलेजेशन ऑफ अटेम्प्ट टू सुसाईड’ या विषयावर आपल्या 210 व्या अहवालात काही सिफारशी केल्यात. यामध्ये ‘आयपीसी कलम 309’ दंड संहितेतून काढून टाकण्याचीही शिफारस केली गेलीय.

विधी आयोगाच्या म्हणण्यानुसार, कलम 309 अमानवीय आहे. हे कलम हटविण्याची सरकार तयारी करत आहे. याशिवाय सीआरपीसी आणि आयपीसीच्या आणखी काही कलमांमध्ये संशोधनाची प्रक्रियाही सुरू आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.