देशात मोदी सर्वात लोकप्रिय, जातीय-परिवारवादाचा अंत : अमित शाह

देशातील सर्वात मोठ्या राज्यात भाजपची एकहाती सत्ता आली आहे. याबद्दल प्रथम भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी लोकांचे अभिनंदन केले आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास आणि त्यांच्या कामांचा आहे. देशात स्वातंत्र्यानंतर मोदीच सर्वात लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. जातीयवाद आणि परिवारवादाचा अंत या निवडणुकीतून दिसून आल्याचे ते म्हणालेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 11, 2017, 04:14 PM IST
देशात मोदी सर्वात लोकप्रिय, जातीय-परिवारवादाचा अंत : अमित शाह title=

लखनऊ : देशातील सर्वात मोठ्या राज्यात भाजपची एकहाती सत्ता आली आहे. याबद्दल प्रथम भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी लोकांचे अभिनंदन केले आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास आणि त्यांच्या कामांचा आहे. देशात स्वातंत्र्यानंतर मोदीच सर्वात लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे. जातीयवाद आणि परिवारवादाचा अंत या निवडणुकीतून दिसून आल्याचे ते म्हणालेत.

उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये जातीवाद आणि घराणेशाहीला नाकारले आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपाला एवढे मोठे यश मिळाले आहे. गरीब जनता मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. त्यामुळे विकासाचे स्वप्न पाहता येणार आहे. देशाचा जीडीपी डबल होण्यासाठी उत्तर प्रदेशचा जीडीपी डबल होण्याची गरज आहे, अमित शाह म्हणालेत.

पाहा अमित शाह काय म्हणालेत?

- चार राज्यांनी भाजपवर दाखवलेला विश्वास शत-प्रतिशत खरा करून दाखवणार 

- स्वातंत्र्यानंतर नरेंद्र मोदी सर्वात ताकदवान नेते म्हणून समोर आले आहेत 

- उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये जातीवाद आणि घराणेशाहीला नाकारलं आहे 

- स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भाजपला एवढं मोठं यश मिळालं आहे 

- गरीब जनता मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे 

- हा जनतेच्या इच्छाशक्तीचा विजय 

- भाजप चार राज्यांत सरकार स्थापन करणार आहे 

- उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमधल्या जनतेचं अभिनंदन करतो