नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत मेट्रोनं प्रवास केला. यावेळी त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टर्नबुल माल्कम हे सुद्धा होते. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान सध्या भारत दौ-यावर आले आहेत. या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या मेट्रो प्रवासादरम्यान त्यांना पाहण्यासाठी आणि मोबाईलमध्ये त्यांची छबी टिपण्याकरता मेट्रो स्थानकावर दिल्लीकरांनी मोठी गर्दी केली होती.
त्यानंतर मोदी आणि माल्कम यांनी दिल्लीतल्या अक्षरधाम मंदिराला भेट दिली. विस्तीर्ण अशा अक्षरधाम मंदिराची आणि तिथल्या वास्तूशिल्पाची या दोघांनी खास गाडीत बसून पाहणीही केली.