सून भडकली तिने सासूची लावली ऑनलाइन बोली

एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. चक्क भांडखोर सासूची सूनेने चक्क ऑनलाईन बोली लावली. अनेक घरात सासू - सुनेत पटत नसल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मात्र, ऑनलाईन बोली लावल्याचे पुढे आलेय.

Updated: Nov 26, 2015, 11:46 PM IST
सून भडकली तिने सासूची लावली ऑनलाइन बोली title=

नवी दिल्ली : एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. चक्क भांडखोर सासूची सूनेने चक्क ऑनलाईन बोली लावली. अनेक घरात सासू - सुनेत पटत नसल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मात्र, ऑनलाईन बोली लावल्याचे पुढे आलेय.

ऑनलाइन वस्तूंची खरेदी-विक्री करणा-या एका वेबसाइटवर ही बोली लावल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हे वृत्त व्हायरल झाल्यानंतर संबंधित वेबसाईटने तात्काळ ही पोस्ट हटवून टाकली.
 
जुन्या वस्तूंची खरेदी- विक्री करणाऱ्या एका डॉट कॉमवर सूनेने आपल्या सासूचा फोटो अपलोड केला. शिवाय फोटोसोबतच पोस्टही टाकली.  या पोस्टच्या टॅगलाइनमध्ये सूनेने 'Mother in law in Good condition' असे लिहीले. तसेच याच्या बदल्यात तिने एका पुस्तकाची मागणी केली. या पुस्तकामुऴे आपल्या मनाला शांती मिळेल. म्हणत माझ्या सासूचा आवाज मोठा असून सतत भांडण करते. मी बनविलेल्या जेवणात काहीतरी कमी असल्याचे सांगत असते, अशी पोस्ट सूनेने टाकली.

दरम्यान, ही पोस्ट ऑनलाइन टाकल्यानंतर व्हायरल झाल्यानंतर काही वेळातच संबंधित वेबसाइटने ती पोस्ट संकेतस्थळावरून हटवून टाकली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.