सिग्नल तोडला तर लायसन्स रद्द - गडकरी

मोटर वाहन कायद्यात बदल करण्यात येणार आहे. तसे संकेत केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. कोणी तिनवेळा सिग्नल तोडला तर लायसन्स रद्द होईल, असे गडकरी म्हणालेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 5, 2014, 05:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मोटर वाहन कायद्यात बदल करण्यात येणार आहे. तसे संकेत केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. कोणी तिनवेळा सिग्नल तोडला तर लायसन्स रद्द होईल, असे गडकरी म्हणालेत.
केंद्रीयमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करण्याचा निर्धार केलाय.
मुंडे हे मागच्या सीटवर बसले होते. त्यांनी बेल्ट लावला नव्हता. मुंडेंनी सीट बेल्ट लावला असता तर त्यांचा जीव वाचला असता, असा पुर्नउच्चार गडकरी यांनी केला.
मोटर वाहन कायद्यानुसार तीन वेळा लाल सिग्नल तोडणाऱ्यांचे लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. चालकाचा परवाना किमान 6 महिने निलंबित करण्यात येणार आहे, अशी माहीती गडकरी यांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.