नगरपरिषद निवडणुकीत म्हणून भाजपला यश मिळाले...

महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत परफॉर्मन्स दाखवा, अशा स्पष्ट सूचना थेट दिल्लीतूनच देण्यात आल्याने, भाजपला घवघवीत यश मिळाल्याचं आता पुढे येत आहे.

Updated: Nov 29, 2016, 12:03 PM IST
नगरपरिषद निवडणुकीत म्हणून भाजपला यश मिळाले... title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत परफॉर्मन्स दाखवा, अशा स्पष्ट सूचना थेट दिल्लीतूनच देण्यात आल्याने, भाजपला घवघवीत यश मिळाल्याचं आता पुढे येत आहे.

नगरपरिषदकांच्या निवडणुकांमधल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये पराभव झाला असता तर त्याचं खापर नोटाबंदी या पंतप्रधानांच्या निर्णयावर फोडलं गेलं असते. ते भाजपला नको होते. त्यामुळे, सक्त सूचना देण्यात आल्या होत्या, असे भाजपमधील सूत्रांकडून सांगण्यात आले.

निवडणूक प्रचाराआधी मुख्यमंत्री आणि भाजप वरिष्ठांनी सर्व प्रमुख नेते आणि मंत्र्यांची बैठक बोलावली होती. आपापल्या जिल्ह्यात तळ ठोकून बसा, प्रचारावर लक्ष केंद्रीत करा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. म्हणूनच पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमधला विजय साध्य झाल्याचे बोलले जात आहे.