नवी दिल्ली : जगामध्ये सर्वात अधिक मुस्लीम धर्माच्या लोकसंख्येची वेगाने वाढ होत आहे. भारतात ही मुस्लीम धर्माच्या लोकांची वाढ इतर धर्माच्या तुलनेने अधिक झपाट्याने होत आहे. २०५० मध्ये भारतात सर्वाधिक संख्या मुस्लीम लोकांची असणार आहे असं अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.
अमेरिकन टॅंक पिऊ रिसर्च सेंटरने जगभरातील लोकसंख्येवर अहवाल तयार केला आहे. 'जगामध्ये ख्रिश्चन धर्मानंतर मुस्लीम लोकांची लोकसंख्या अधिक आहे. पण ख्रिश्चन लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिमांची लोकसंख्या अधिक वेगाने वाढत असल्याचं अहवालात म्हटलं आहे,. त्यामुळे 2050 मध्ये मुस्लिमांची संख्या सर्वाधिक असणार आहे. विशेष म्हणजे भारतात सर्वाधिक मुस्लीम असणार असणार आहेत.
जगातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लीम धर्माची लोकसंख्या १३ टक्के आहे. २०१५ मध्ये ही संख्या ७३ टक्के होणार आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इराण आणि तुर्कीमध्ये मुस्लिमांची संख्या अधिक आहे. पण इंडोनेशियात सर्वाधिक मुस्लीम नागरिक असतील असंही या अहवालात म्हटले आहे.