'काँग्रेस आणि मृत्यू यांना सारखंच वरदान' - मोदी

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला ते उत्तर देत होते.

Updated: Mar 9, 2016, 05:48 PM IST
'काँग्रेस आणि मृत्यू यांना सारखंच वरदान' - मोदी title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाला मृत्यूसारखं वरदान असल्याचं म्हटलं आहे. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला ते उत्तर देत होते.

काँग्रेसने संसदेच्या कामकाजात किती ही अडथळे आणले तरी काँग्रेस बदनाम होत नाही, काँग्रेसला मृत्यूसारखं वरदान आहे, जसे एखाद्याला मृत्यू आला तर, त्याला कारण असतं, जसं तो कर्करोगाने गेला, तो अपघाताने गेला, यात कर्करोग आणि अपघात बदनाम होतात, मृत्यू नाही, तसेच काँग्रेसचे असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं, ज्याप्रमाणे मृत्यू बदनाम होतं, नाही तसंच कारण काँग्रेसला लागू होतं.

बडोद्याच्या गायकवाड संस्थानने मुलींना शिक्षण दिले नाही, तर १ रूपया दंड आकारला होता, त्यामुळे जुन्या काळापासून आतापर्यंत तेथे शिक्षण घेणाऱ्या महिलांची संख्य़ा अधिक आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं.