पंतप्रधानांची भेट घेऊन मोदींची दिल्ली दौऱ्याला सुरुवात

गुजराचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच त्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 6, 2013, 11:19 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
गुजराचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज सकाळीच त्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केलीय.
गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर तिसऱ्यांदा रुजू झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतलीय. यावेळी पंतप्रधानांनी मोदींशी दीर्घकाळ चर्चा केलीय. यावेळी पंतप्रधानांनी नव्या गुजरात सरकारला शुभेच्छा दिल्याचं नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. पण, ही दीर्घकाळ चाललेली चर्चा कोणत्या विषयावर होती, यावर मात्र नरेंद्र मोदींनी काहीही भाष्य केलेलं नाही.

भाजपमध्ये पंतप्रधानपदाचे सगळ्यात मोठे दावेदार नरेंद्र मोदी आज दिल्लीत दाखल झालेत ते युवा वर्गाशी संवाद साधण्यासाठी... दिल्लीच्या श्रीराम कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांशी मोदी संवाद साधणार आहेत. यावेळी ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं देताना दिसतील...तरुणांमध्ये मोदी लोकप्रिय आहेत.. हीच लोकप्रियता कॅश करण्यासाठी मोदींचा हा विद्यार्थ्यांशी संवाद असल्याचं सांगण्यात येतंय.