माल्याच्या अटकेनंतर पहिल्यांदाच बोलले मोदी...

 'किंगफिशर'चा मालक विजय माल्याच्या लंडनमध्ये झालेल्या अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 

Updated: Apr 18, 2017, 10:31 PM IST
माल्याच्या अटकेनंतर पहिल्यांदाच बोलले मोदी...  title=

नवी दिल्ली : 'किंगफिशर'चा मालक विजय माल्याच्या लंडनमध्ये झालेल्या अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विषयावर सूचक वक्तव्यात भाष्य केलंय.

भारतातून जवळपास 12,000 करोड रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय माल्याला आज लंडनमध्ये अटक करण्यात आली आणि लगेच जामीनही मंजूर झाला. 'पीटीआय'नं दिलेल्या माहितीनुसार या दरम्यान, पंतप्रधान मोदींनीही यावर प्रतिक्रिया नोंदवलीय. गरीब, मध्यम वर्गीयांना लुटणाऱ्यांना लुटलेलं सगळं परत करावंच लागेल अशा शब्दांत मोदींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

माल्यावर भारतीय बँकांचं 9000 करोड सहीत एकूण 12,000 करोड रुपयांहून अधिक कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. माल्ल्याला ताब्यात घेण्यासाठी सीबीआय टीम लंडनमध्ये जाणार आहे... विजय माल्याला अटक वेस्टमिन्स्टर कोर्टाच्या आदेशानंतर झालीय, हे विशेष... मार्च 2016 रोजी कर्जबुडव्या माल्या ब्रिटनमध्ये पळून गेला होता. जानेवारी 2017 मध्ये सीबीआयनं त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं होतं. भारत सरकारनं 8 फेब्रुवारी रोजी माल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटन सरकारकडे अर्ज दाखल केला होता. त्यानंतर, 24 मार्च रोजी माल्याला भारताकडे प्रत्यर्पण करण्याची भारताची मागणी ब्रिटन सरकारनं मंजूर केली होती.