नाराजी नाट्याचा 'तिसरा अंक' आता दिल्लीत

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, पण चर्चेत काहीही निष्पन्न झालं नसल्याचं, काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Updated: Jul 22, 2014, 02:24 PM IST
नाराजी नाट्याचा 'तिसरा अंक' आता दिल्लीत title=

मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली, पण चर्चेत काहीही निष्पन्न झालं नसल्याचं, काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

चर्चेत काहीही निष्पन्न झालं नसल्याने आपण सोनिया गांधींशी येत्या दोन दिवसांत चर्चा करू असंही नारायण राणे यांना सांगण्यात आलं आहे.

नारायण राणे यांचा उद्योग मंत्रिपदाचा राजीनामाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वीकारलेला नाही. पक्षासाठी आपली गरज आहे, आपण पुन्हा कामाला सुरूवात करा, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. 

तसेच पक्षाकडून पक्षातील कोणत्या पदाविषयी ऑफर मिळाली नसल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांच्या नाराजीवर आता सोनिया गांधी यांच्याशी चर्चा होणार असल्याने, आता नारायण राणे यांच्या नाराजीवर दहा जनपथवर चर्चा होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.