सिद्धू पती-पत्नी यांच्या राजीनाम्याची कारणे

राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पीएम मोदीच्या म्हणण्यावरुन हे पद स्विकारलं होतं.' पण पंतप्रधान मोदींना न सांगता सिद्धू यांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. 

Updated: Jul 18, 2016, 06:17 PM IST
सिद्धू पती-पत्नी यांच्या राजीनाम्याची कारणे title=

नवी दिल्ली : राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पीएम मोदीच्या म्हणण्यावरुन हे पद स्विकारलं होतं.' पण पंतप्रधान मोदींना न सांगता सिद्धू यांनी हा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. 

सिद्धू यांनी म्हटलं की, 

- योग्य आणि अयोग्य यामधला गोष्ट निवडायची होती. त्यामुळे राज्यसभेच्या खासदारपदाचा राजीनामा दिला. 
- पंतप्रधानांच्या आदेशामुळे मी पंजाबच्या विकासासाठी हे पद स्विकारलं होतं.
- पंजाबच्या विकासाचे सगळे रस्ते बंद झाले आहेत त्यामुळे हे पद जड वाटत होतं.

अकाली गठबंधनच्या विरोधात सिद्धू आणि त्यांची पत्नी :

- सिद्धू यांची पत्नी नवजोत कौर सिद्धू या पंजाबमध्ये भाजपच्या आमदार आहेत. नवज्योत कौर या अनेक दिवसांपासून अकाली दलवर टीका करत होत्या.
- भाजपने या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढावं आणि सिद्धू यांना मोठी जबाबदारी मिळावी असं त्यांचं मत आहे.
- नवज्योत कौर यांनी काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत पक्षातून जाणार असल्याचे संकेत दिले होते. 
- अकाली दल आणि भाजप एकत्र निवडणुका लढवतील पण मी आणि सिद्धू प्रचार करणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं होतं.
- दोघेही आम आदमी पक्षाच्या संपर्कात असल्याचं देखील म्हटलं जात आहे.