नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसला जास्तीत जास्त 8 ते 10 जागा वाढवून मिळतील, अशी शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत स्वतः शरद पवारांनी हे संकेत दिलेत. जिथं काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार सलग दोनदा पराभूत झालेत, तिथं अदलाबदल होण्याची शक्यता आहे.
येत्या 3-4 दिवसांत मुंबईत जागावाटपाची चर्चा सुरू झाल्यास 20 ऑगस्टपर्यंत यादी जाहीर होईल, अशी शक्यताही वर्तवण्यात येतेय.
दिल्लीत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात झालेल्या बैठकीत काँग्रेस राष्ट्रवादीसाठी दहा जास्त, म्हणजेच 124 जागा सोडण्याची तयारी असल्याचं समजतंय. त्या पार्श्वभूमीवर पवारांच्या संकेतांना महत्त्व प्राप्त झालंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.