ISISनंतर आणखी एक दहशतवादी संघटनेचा उदय

कश्मीरमध्ये होणारे हल्ले थांबत नाही तर दुसरीकडे ISIS ही सतत हल्ले करत आहे. यामध्येच आणखी एक दहशतवादी संघटना डोके वर काढू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दहशतवादी संघटनेचे नाव अफगाणी ब्रिगेड असे आहे.

Updated: Dec 4, 2015, 07:17 PM IST
ISISनंतर आणखी एक दहशतवादी संघटनेचा उदय title=

श्रीनगर : कश्मीरमध्ये होणारे हल्ले थांबत नाही तर दुसरीकडे ISIS ही सतत हल्ले करत आहे. यामध्येच आणखी एक दहशतवादी संघटना डोके वर काढू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दहशतवादी संघटनेचे नाव अफगाणी ब्रिगेड असे आहे.

अफगाणी ब्रिगेडचा प्रवक्ता सैफुल्ला सैफी यांच्या म्हण्यानुसार त्यांच्या संघटनेचा चीफ कंमाडर मुहम्मद मुल्ला उमर आहे. काही पत्रकारांना हे सांगितले आहे, सैफीने काही दिवसांपूर्वी टंगडार येथे सैनिकी छावणीवर हल्ला केलेल्या जैश-ए-मोहम्मद कंमाडरला मारण्यात आले होते. त्यालाच श्रद्धांजली देण्यासाठी सुरक्षा दलाच्या विरूद्ध लढण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.  

अफगाणी ब्रिगेड प्रवक्ताच्या बोलल्यानुसार त्यांचे संघटना भारतीय सुरक्षा एजेन्सीच्या विरूद्धच्या लढाईत कोणत्याही सामान्य नागरिकांना त्रास द्याचा नाही. त्यामुळे त्यांनी सुरक्षा दल आणि त्यांच्या वाहन, छावण्यापासून लांब राहण्यास सांगितले आहे.

सैफीने असे ही सांगितले की त्यांच्याकडे सुरक्षा दलात काम करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची यादी आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.