भारतात धावणार नव्या जमान्याची नवी ट्रेन

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवीरी नव्या जमाण्याची नवी ट्रेन सुरू करण्याला हिरवा कंदिल दर्शविला आहे. त्यांनी विशाखापट्टनम ते अराकूदरम्यान नवीन 'विस्टाडोम कोच' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनचे छत काचेचे असणार आहे तसेच त्यामध्ये एलईडी लाईट, प्रशस्त सीट आणि जीपीएस आधारीत सूचना प्रणाली इत्यादी सुविधा असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना लवकरच या ट्रेनने प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. या ट्रेनने प्रवास करताना प्रवाशांना निसर्ग सौंदर्य अनुभवता येणार आहे.

Intern - | Updated: Apr 17, 2017, 04:35 PM IST
भारतात धावणार नव्या जमान्याची नवी ट्रेन title=

भुवनेश्वर : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रविवीरी नव्या जमान्याची नवी ट्रेन सुरू करण्याला हिरवा कंदिल दर्शविला आहे. त्यांनी विशाखापट्टनम ते अराकूदरम्यान नवीन 'विस्टाडोम कोच' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनचे छत काचेचे असणार आहे तसेच त्यामध्ये एलईडी लाईट, प्रशस्त सीट आणि जीपीएस आधारीत सूचना प्रणाली इत्यादी सुविधा असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना लवकरच या ट्रेनने प्रवासाचा आनंद लुटता येणार आहे. या ट्रेनने प्रवास करताना प्रवाशांना निसर्ग सौंदर्य अनुभवता येणार आहे.

तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये 'लाईफ लाईन एक्सप्रेस' सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे गरिबांना प्रवास करणे सोईचे होईल असे त्यांनी म्हटले आहे.