पणजी : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर आता बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. पणजीमधल्या मोपा विमानतळाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मोदींनी हे वक्तव्य केलं आहे.
देशाचे नागरिक जी शिक्षा देतील ती मी भोगायला तयार आहे, निवडणुकीवेळी मी जे आश्वासन दिलं ते पूर्ण करणार आहे. देशवासियांना त्रास होत आहे हे मला माहिती आहे, त्यांनी फक्त 50 दिवस मला साथ द्यावी, अशी भावनिक सादही मोदींनी नागरिकांना घातली आहे.
काही जण माझ्या विरोधात आहेत, ते मला जगू देणार नाहीत कारण 70 वर्ष देशाला लुटलेल्यांना मी गोत्यात आणलं, असंही पंतप्रधान म्हणाले आहेत. मोठ्या पदावरच्या खूर्चीवर बसण्यासाठी मी आलो नाही. देशासाठी मी माझं कुटुंब आणि माझं घरं सोडलं असं सांगताना मोदी भावूक झाले.
#WATCH: PM Narendra Modi seeks blessings from the people to defeat the menace of corruption. pic.twitter.com/SXnpZ5mjqI
— ANI (@ANI_news) 13 November 2016
#WATCH: PM Modi says, "Those involved in big scams, now have to stand in long queues to take out Rs 4000." pic.twitter.com/SA19ULRvMJ
— ANI (@ANI_news) 13 November 2016
WATCH: #Demonetisation process started 10 months ago says PM Narendra Modi explaining the move pic.twitter.com/sIp4x50baB
— ANI (@ANI_news) 13 November 2016
#WATCH: PM Modi breaks down, says “I was not born to sit on a chair of high office. Whatever I had, my family, my home-I left it for nation” pic.twitter.com/7I5meQz1tZ
— ANI (@ANI_news) 13 November 2016