निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न

दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला दोषी विनय शर्मानं तिहाड जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

Updated: Aug 25, 2016, 07:31 PM IST
निर्भया बलात्कार प्रकरणातल्या दोषीचा आत्महत्येचा प्रयत्न title=

नवी दिल्ली : दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणातला दोषी विनय शर्मानं तिहाड जेलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. विनय शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे. 

विनय शर्मानं जेलमध्येच स्वत:ला गळफास लावून घेतला. त्यानं आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी काही औषधं घेतल्याचंही बोललं जात आहे. विनयला तिहाड जेलच्या 8 नंबर जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.