www.24taas.com,नवी दिल्ली
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आज दिल्लीतल्या रामलीला मैदानावर जोरदार शक्ति प्रदर्शन केलं. यावेळी केंद्र सरकारवर टीका केली. काँग्रेस पक्ष राज्याबाबत राजकारण करीत आहे. बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी नितीश कुमार यांनी केली.
रामलिला मैदानात नितीश कुमार यांची सभा झाली. या सभेला लाखांपेक्षा अधिक बिहारी उपस्थित होते. बिहारला विशेष राज्याचा दर्जा द्यावा या मागणीसाठी जनतादल युनायटेडनं ह्या सभेचं आयोजन केलं होतं. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत शक्तिप्रदर्शन करण्याच्या हेतूनं नितीश कुमार यांनी या सभेचा उपयोग केल्याचे राजकीय विश्लेषकांनी म्हटलं आहे.
ही सभा यशस्वी होण्यासाठी जनता दल युनायटेनं जोरदार तयारी केली होती. त्यात ते यशस्वी झाले आहेत. पक्षाचे दिग्गज नेते गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून होते. विकास हा आमचा हक्क आहे. त्यासाठी बिहार राज्याला विषेश राज्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी नितीश यांनी केली. विकास रोखण्यासाठी काँग्रेस राजकारण करीत असल्याचा घणाघाती आरोप यावेळी त्यांनी केला.
पक्षपाती धोरणामुळे बिहारचा विकास रोखला गेला आहे. त्यामुळे बिहारची अधोगती झाली आहे. याला काँग्रेसचे सरकार जबाबदार आहे, असे नितीश म्हणाले.