काळ्या पैसा : ‘ICICI’नं १८ कर्मचाऱ्यांना ठरवलं दोषी

बँकेत होणाऱ्या गैरव्यवहारांना जबाबदार ठरवत ‘आयसीआयसीआय’ बँकेनं आपल्या १८ कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 16, 2013, 02:41 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
बँकेत होणाऱ्या गैरव्यवहारांना जबाबदार ठरवत ‘आयसीआयसीआय’ बँकेनं आपल्या १८ कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय.
`कोब्रापोस्ट डॉट कॉम` या खासगी ऑनलाइन वृत्तसंस्थेने स्टिंग ऑपरेशनद्वारे `एचडीएफसी `, `आयसीआयसीआय` आणि `अॅक्सिस` या खासगी बँकांच्या व्यवहारांचा पदार्फाश केल्याचा दावा केला होता. त्यानंतर काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रक्रियेत खासगी बँका सहभागी असतील, तर त्यांची चौकशी करण्यात येईल. त्यात त्या दोषी आढळल्या, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं केंद्र सरकारने शुक्रवारी स्पष्ट केलं होतं.

याचप्रकरणात आयसीआयसीआय बँकेनं शुक्रवारी आपल्या १८ कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय. दरम्यान, बँकेने नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल दोन आठवड्यात सादर करण्यात येणार आहे... हे प्रकरण आपण खूप गंभीरपणे घेतल्याचं बँकेनं म्हटलंय. बँकेच्या धोरणांचे उल्लंघनकरणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असंही आयसीआयसीआनं स्पष्ट केलं.