नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करत नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुवर्ण ठेव योजना सुरु केली खरी मात्र मोदींच्या या योजनेचा बार फुसका निघाला. देशातील नागरिकांनी म्हणावा तितका प्रतिसाद या योजनेला दिलेला नाही.
पाच नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आलेल्या योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील अवघे 400 ग्रॅम सोने जमा झाले. नागरिकांची उदासीनता पाहता ही योजना लोकप्रिय करण्यासाठी ज्वेलर्सची मदत घेतली जात आहे.
पंतप्रधान मोदींनी पाच नोव्हेंबरला ही योजना लाँच केली. या योजनेंतर्गत कोणताही नागरिक अधिकाधिक 15 वर्षांपर्यंत सोने जमा करु शकतो. या सोन्यावर अडीच टक्के व्याज वर्षाला मिळेल.
देशात घरांमध्ये तसेच मंदिरांमध्ये तब्बल 20 हजार टन सोने जमा आहे. ज्याची किंमत तब्बल 52 लाख कोटी रुपये इतकी आहे. योजनेत जमा झालेल्या सोन्याचे प्रमाण पाहता ही योजना लोकांना आवडलेली दिसत नाहीये. त्यामुळे ही योजना लोकप्रिय बनवण्याचे आव्हान आता सरकारसमोर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.