www.24taas.com,नवी दिल्ली
आता तुम्हाला खिशावर ताबा ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण तुम्ही जास्त पैशाची नोकरी करीत असाल तरीही तुमच्या हातात कमी पगार पडणार आहे. त्यामुळे घर चालविताना तुम्हाला आता कसरत करावी लागणार आहे. तुमच्या पगारावर लक्ष असणार आहे ते भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे. ईपीएफओने जारी केलेल्या परित्रानुसार तुमचा पगार कमी होणार आहे.
ईपीएफओने हे परिपत्र ३० नोव्हेंबरला काढले आहे. त्यानुसार पीएफ कटींग जास्त होणार आहे. यामध्ये सर्व भत्त्यांचा समावेश आहे. आतापर्यंत पगाराच्या बेसिकवर कटींग होत होते. आता सर्वभत्त्यांसाठी कटींग असणार आहे. त्यामुळे आगामी काळात नोकरदारांच्या हातात कमी पगार येण्याची शक्यता आहे. भविष्य निर्वाह निधी, म्हणजे पीएफचं कटिंग वाढण्य़ाचे संकेत पीएफ कार्यालयाच्या एका सूचनेमुळे मिळालेत.
आजवर बेसिक पगार आणि महागाई भत्त्यावर मोजला जाणारा पीएफ, बेसिक आणि अलाऊन्सेस अशा एकत्रित रक्कमेवर कापला जावा, अशी सूचना ईपीएफओनं केलीये. देशभरातल्या ईपीएफ कार्यालयांना याबाबत सूचना पाठवण्यात आल्यात.
दरम्यान, अनेक खासगी कंपन्यांमधले अलाऊंसेस विविध प्रकारचे असल्यामुळे याच्या अमलबजावणीत काही तांत्रिक अडचणी असल्याचं सूत्रांनी म्हटलंय.