समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणं निराशाजनक - सोनिया गांधी

समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणं निराशाजनक असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी सर्वोच्य न्यायलयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 12, 2013, 03:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणं निराशाजनक असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी सर्वोच्य न्यायलयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
समलैंगिक संबंध ठेवणे हा अपराध आहे. तो गुन्हा आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल देताना म्हटले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना मान्यता असल्याचे म्हटले होते. याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना असे संबंध ठेवले तर तो गुन्हा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. याबाबत सोनिया गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे. अशा संबंधांना गुन्हा ठरवणं निराशाजनक, असे त्या म्हणाल्यात.
संसद भारतीय दंडविधानाच्या कलम ३७७ बाबत लक्ष घालेल, अशी अपेक्षा सोनियांनी व्यक्त केली आहे. समलैंगिक संबंध भारतात गुन्हाच असाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कालच दिला होता. दरम्यान, सोनियांच्या प्रतिक्रियेनंतर सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत.
समलैंगिक संबंध भारतात अपराधच हा निर्णय देताना न्यायालयाने सरकारला अॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी यांचं मत मागवून कायद्यात बदल करता येऊ शकतो, असंही सुचवलं होतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.