तिरुपती : तिरुमला डोंगरावरचं प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिर नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसाच्या निमित्तानं गजबजलेलं दिसलं.
केवळ शुक्रवारी तिरुपती बालाजी मंदिरात जवळपास तीन करोड रुपयांची रोख रक्कम जमा झालीय. याशिवाय चढाव्यात भेट दिलेले सोन्या - चांदीचे दागिने वेगळे...
अटक वाचा - शिर्डीच्या दानपेटीत ख्रिसमस हॉलीडे बोनान्झा
पहिल्या दिवसांची देवदर्शनानं सुरुवात करणारे अनेक भाविक इथं उपस्थित झाले होते... आणि या दिवशी त्यांनी सढळ हस्ते दानही केलंय. देवस्थानच्या जनसंपर्क अधिकारी पी. नीलिमा यांनी शुक्रवारी ही माहिती दिलीय.