नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोने शुक्रवारपासून राजीव चौक आणि कश्मीरी गेट या दोन स्थानकांवर वाय-फाय सेवा सुरु केलीये. या सेवेंतर्गत पहिल्या ३० मिनिटांसाठी मोफत वायफाय देण्यात येणार आहे. त्यानंतर वायफाय वापरल्यास त्यासाठी पैसे मोजावे लागतील.
दिल्ली मेट्रोने परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. मेट्रो स्थानकांवर वायफाय सेवा देण्याबाबत २०१५ मध्ये डीएमआरसी आणि रेल्वे टेलि कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यात संमतीपत्रावर स्वाक्षऱ्याही झाल्या होत्या.
डीएमआरसीनुसार वायफाय सेवेसाठी दिल्लीतील सध्या पाच स्थानकांची निवड करण्यात आलीये. लवकरच दिल्ली विद्यापाठी, केंद्रीय सचिवालय येथेही वायफाय सेवा सुरु केली जाईल.