दिल्लीत प्रदूषण वाढले, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

राजधानी दिल्लीत प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडलीये. धूर आणि धुक्याने दिल्ली झाकोळून गेलीय. 

Updated: Nov 6, 2016, 02:28 PM IST
दिल्लीत प्रदूषण वाढले, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडलीये. धूर आणि धुक्याने दिल्ली झाकोळून गेलीय. 

या प्रदूषणामुळे दिल्लीचे नागरिक हैराण झालेत. दिल्लीत प्रदूषणाने सारेच रेकॉर्ड तोडलेत. दिल्लीतलं प्रदूषण इतकं वाढलंय की शनिवारी प्रदूषणमापन यंत्रही आकडेवारी घेण्यात फेल ठरलंय.

दिल्लीतील वाढत असलेल्या प्रदूषणाचा धोका लक्षात घेता केजरीवाल सरकारने याप्रकरणी आपातकालीन बैठक बोलावली आहे.