ओवेसींकडून दहशतवाद्यांना प्रोत्साहन - केंद्र सरकार

ओवेसींकडून दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असून आम्ही त्याचा निषेध करतो, असं केंद्रीय अल्पसंख्यांक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे.

Updated: Jul 3, 2016, 07:14 PM IST
 ओवेसींकडून दहशतवाद्यांना प्रोत्साहन - केंद्र सरकार title=

नवी दिल्ली : ओवेसींकडून दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असून आम्ही त्याचा निषेध करतो, असं केंद्रीय अल्पसंख्यांक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे.

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या संशयित दहशतवाद्यांना आवश्‍यक ती कायदेशीर मदत करण्याच्या निर्णयाचा केंद्र सरकारने निषेध केला आहे, ते दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

 केंद्रीय अल्पसंख्यांक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, 'ओवेसी यांनी दहशतवादी आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देणारे अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण करू नये. राजकारण करा, विरोध करा, पण तुम्ही दहशतवादाच्या बाजूने असल्याचे दाखवू नका', तसेच पाठिंबा देऊन ओवेसी दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असल्याचेही ते म्हणाले. 

इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याच्या संशयावरून काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.  हैदराबाद येथे राष्ट्रीय तपास संस्थेने हा छापा टाकला होता.

दरम्यान, संशयितांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी एमआयएम मदत करणार असल्याचे ओवेसी यांनी जाहीर केले. त्यामुळे ओवेसींवर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे.

तर एका बाजूला मालेगाव स्फोटातील आरोपींच्या मागे भाजप आहे तर राष्ट्रीय तपास संस्थेने ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांच्या मागे एमआयएम आहे, अशी टीका दिग्विजयसिंह यांनी केली आहे.

संयुक्त जनता दलाने 'देशविरोधक ओवेसी यांचे संसद सदस्यत्व रद्द करून त्यांना तुरुंगात पाठवावे' अशी मागणी केली आहे. तर कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी ओवेसी यांच्यासह  भाजपलाही लक्ष्य केले आहे.