पाकिस्तानची खुमखुमी कायम, सीमा भागात गोळीबार सुरुच

काश्मीरमध्ये पुन्हा पुन्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. आरएसपुरा, अरनियामध्ये पाकिस्तानकडून रात्री 2 वाजल्यापासून गोळीबार सुरु आहे.

PTI | Updated: Oct 27, 2016, 08:34 AM IST
पाकिस्तानची खुमखुमी कायम, सीमा भागात गोळीबार सुरुच title=

जम्मू : काश्मीरमध्ये पुन्हा पुन्हा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. आरएसपुरा, अरनियामध्ये पाकिस्तानकडून रात्री 2 वाजल्यापासून गोळीबार सुरु आहे.

पाकिस्तानी रेंजर्सनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत रात्रभर उखळी तोफांचा मारा केला. या हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचा एक अधिकारी जखमी झाला. तर सीमेलगतच्या गावातील सहा नागरीकही जखमी झालेत.

पाकिस्तानच्या माऱ्याला भारतीय सैन्याकडूनही चोख उत्तर दिलं जात आहे. मंगळवारीही पाकिस्तानकडून रात्रभर गोळीबार करण्यात येत होता. यात 11 भारतीय नागरिक जखमी झाले होते. त्यावेळी भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 3 सैनिक ठार झालेत.