श्रीनगरमध्ये आंदोलकांनी फडकवलेत पाकिस्तान, ISISचे झेंडे

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या ऐतिहासिक जामीया मशिदीजवळ नमाजानंतर आंदोलकांनी शुक्रवारी पुन्हा पाकिस्तान आणि ISISचे झेंडे फडकविलेत.

Updated: Apr 9, 2016, 03:00 PM IST
श्रीनगरमध्ये आंदोलकांनी फडकवलेत  पाकिस्तान, ISISचे झेंडे title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरच्या ऐतिहासिक जामीया मशिदीजवळ नमाजानंतर आंदोलकांनी शुक्रवारी पुन्हा पाकिस्तान आणि ISISचे झेंडे फडकविलेत.

आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांवर जोरदार दगडफेकही केली. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा मारा करावा लागला.

दरम्यान, तिरंगा फडकविल्याबद्दल श्रीनगरमधील एनआयआयटीतील विद्यार्थ्यांवर झाल्याची घटना ताजी असताना आता दिल्लीहून २५० तरुणांचा जत्था तिरंगा घेऊन श्रीनगरकडे रवाना झालाय.  

एनआयटीमधील बिगर काश्मीरी विद्यार्थ्यांनी काश्मीरी विद्यार्थ्यांच्या निषेधार्थ तिरंगा फडकवला होता. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता. याचे पडसाद देशभरात उमठत असून या घटनेचा निषेध करण्यासाठी हे तरुण तिरंगा फडकवण्यासाठी श्रीनगरकडे रवाना झालेत