नवी दिल्ली : बाजारात लाँच होऊन अवघा एक आठवडाही उलटत नाही तोच रामदेव बाबांच्या पतंजली संस्थेच्या आटा नूडल्स वादात सापडल्या आहेत. विनापरवाना आटा नूडल्सची विक्री केल्याबद्दल पतंजलीला राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि मानव प्राधिकरणाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तसेच या नूडल्स बनवणा-या आकाश योग या कंपनीलाही नोटीस बजावण्यात आली आहे. याच आठवड्यात बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेची आटा नूडल्स बाजारात दाखल झाली होती. मात्र या नूडल्सला एफएसएसआयनं परवानगी दिली नव्हती तरीही या नूडल्स बाजारात दाखल झाल्यानं ही नोटीस बजावण्यात आली आहे. आता पतंजली संस्थेला यावर 15 दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आलेत.
दरम्यान, मॅगी नुडल्सचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने त्या संबंधी काय निकाल येतो याची राज्य सरकार प्रतीक्षा करत असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. राज्य सरकार मॅगीच्या नमुन्यांची तपासणी सुरु ठेवणार असल्याचेही ते म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.