पठाणकोट हल्ल्यानंतर नेटिझन्सच्या निशाण्यावर नरेंद्र मोदी

दहशतवादी हल्ल्यानं भारत पुन्हा एकदा हादरलाय. पंजाबमध्ये पठाणकोटच्या एअरबेसला यावेळी दहशतवाद्यांनी आपलं लक्ष्य केलंय. यावर, नेटिझन्सच्या निशाण्यावर आलेत ते पाकला आणि पाकच्या पंतप्रधान शरीफांना 'सरप्राईज' भेट देणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

Updated: Jan 2, 2016, 04:04 PM IST
पठाणकोट हल्ल्यानंतर नेटिझन्सच्या निशाण्यावर नरेंद्र मोदी title=

नवी दिल्ली : दहशतवादी हल्ल्यानं भारत पुन्हा एकदा हादरलाय. पंजाबमध्ये पठाणकोटच्या एअरबेसला यावेळी दहशतवाद्यांनी आपलं लक्ष्य केलंय. यावर, नेटिझन्सच्या निशाण्यावर आलेत ते पाकला आणि पाकच्या पंतप्रधान शरीफांना 'सरप्राईज' भेट देणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी...

या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत. तर चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळालंय. या बातमीनंतर #PathankotAttack वायरल झालाय. भारतानं मोदींच्या 'पाक'भेटीची मोजलेली ही किंमत आहे, अशा तिखट शब्दांत या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत. नेटिझन्स आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.