नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे. पेट्रोलच्या दरात ९१ पैसे तर डिझेलच्या दरात ८४ पैसे कपात होणार आहे. ही कपात मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरून यापूर्वीच सरकारने नियंत्रण हटवलं आहे. म्हणून जागतिक घडामोडी तसेच कच्च्या तेलाच्या किमतीवरून पेट्रोल, डिझेलचे दर कमी जास्त होत असतात.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर खाली येत आहेत, यामुळे ऑगस्टपासून पेट्रोलच्या दरात सहा वेळेस, तर सप्टेंबरपासून डिझेलच्या दरात दोन वेळेस घट आली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.