पेट्रोल-डिझेलमध्ये दोन महिन्यांत पाचवी दरवाढ...

तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलीय. गुरुवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 1, 2013, 01:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केलीय. गुरुवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आलीय. पेट्रोलच्या किंमतीत ७० पैसे तर डिझेलच्या किंमतीत ५० पैशांनी वाढ करण्यात झालीय.
१ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांत झालेली ही पाचवी दरवाढ आहे. पेट्रोलच्या किंमती या काळात ६ रुपये ८२ पैशांनी वाढल्यात.

तुम्हाला सध्या किती रुपयांत मिळेल पेट्रोल आणि डिझेल (व्हॅटसहीत) पाहा...
पेट्रोल (रुपये प्रति लीटर)
ठिकाण - दरवाढ होऊन किंमत - अगोदरची किंमत – दरवाढ
मुंबई : ७८.६१ – ७७.७३ – ०.८८
दिल्ली : ७१.२८ – ७०.२४ – ०.८४
कोलकाता : ७८.६४ – ७७.७६ – ०.८८
चेन्नई : ७४.४९ – ७३.६० – ०.८९
डिझेल (रुपये प्रति लीटर)
ठिकाण - दरवाढ होऊन किंमत - अगोदरची किंमत – दरवाढ
मुंबई – ५७.६१ – ५८.२३ – ०.६२
दिल्ली – ५०.८४ – ५१.४० – ०.५६
कोलकाता – ५५.१६ – ५५.७४ – ०.५८
चेन्नई – ५४.१५ – ५४.७६ – ०.६१
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.