काँग्रेस कार्यकर्त्यांची निर्दयता, जिवंत कबुतराला रॉकेटमध्ये बंद करून उडवलं

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंध्र प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष रघुवीर रेड्डी यांच्या स्वागतासाठी उडवलेल्या रॉकेटमध्ये चक्क जिवंत कबुतराला कागदात बंद करून उडवलं. हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. 

Updated: Oct 5, 2015, 09:47 AM IST
काँग्रेस कार्यकर्त्यांची निर्दयता, जिवंत कबुतराला रॉकेटमध्ये बंद करून उडवलं title=

हैदराबाद: काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंध्र प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष रघुवीर रेड्डी यांच्या स्वागतासाठी उडवलेल्या रॉकेटमध्ये चक्क जिवंत कबुतराला कागदात बंद करून उडवलं. हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. 

काँग्रेस कार्यकर्त्यांचं हे कृत्य सुरू असतांना रघुवीर रेड्डी स्वत: तिथं उपस्थित होते. त्यांनी हा सर्व प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिला. वायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कबुतराला पाकिटात कोंबतांना आणि नंतर ते पाकिट रॉकेटला जोडतांना दिसतोय. 

आणखी वाचा - छोट्या हरिणाच्या बछड्याला वाचविण्यासाठी सिंह भिडला दुसऱ्या सिंहांशी, Video व्हायरल

हे रॉकेट मग पेटवून उडविण्यात आलं. कबुतरावर अत्याचार करणारे कार्यकर्ते म्हणतात कबुतर उडून जातं. पण व्हिडिओत असं काही दिसून येत नाहीय. 

पाहा व्हिडिओ - 

 

आणखी वाचा -  एका हत्तीला सोडवण्यासाठी पर्यटकांमध्ये आलं १२ हत्तीचं बळ

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.