नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रात्री आठ वाजता मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावली असून यात काय चर्चा होणार याबाबत अद्याप कोणालाही माहिती नाही.
दरम्यान, नोट बंदीनंतर जो पैसा जमा झाला आहे, त्यावर टॅक्स लावावा की नाही यावर चर्चा करण्यात येणार असल्याचे वृत्त पीटीआय या वृत्त संस्थेने दिली आहे. तसेच अडीच लाखांपेक्षा अधिक पैसा बँकेत जमा करणाऱ्यांनी आपला इनकम सोर्स देऊ शकले नाही. त्यांना लावण्यात येणाऱ्या २०० टक्के दंडावरही पुनर्विचार करण्यात येण्याची शक्यता आहे.
गेल्या ८ नोव्हेंबर रोजी मोदी यांनी अशी बैठक बोलावून मंत्रिमंडळातील सदस्यांना नोटा बंदीचा निर्णयाची माहिती दिली होती. आजही अशा प्रकारे विशेष बैठक बोलावली असून यात नोट बंदी संदर्भात झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येते आहे.
तसेच गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोट बंदीच्या निर्णय घेऊन लोकांना आश्चर्यचकीत केले होते. तशाच प्रकारचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता या बैठकीत घेतला जाऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.