'मन की बात' मधून अपंगांना दिव्यांगांचं बिरुद

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अपंगांना दिव्यांग हे अशी नवीन बिरूद दिलंय. आज मन की बात मध्ये पंतप्रधानींनी ही सूचना अंमलात आणण्याचं आवाहन केलंय.  

Updated: Dec 27, 2015, 01:30 PM IST
'मन की बात' मधून अपंगांना दिव्यांगांचं बिरुद title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अपंगांना दिव्यांग हे अशी नवीन बिरूद दिलंय. आज मन की बात मध्ये पंतप्रधानींनी ही सूचना अंमलात आणण्याचं आवाहन केलंय.  

शिवाय सरकारी योजनांचा फायदा थेट बँकेच्या खात्यात देणाऱ्या पहल या योजनचं नाव गिनीज बुकात नोंदवण्यात आल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत ४० हजार कोटी रुपयांचं वाटप झाल्याचही पतंप्रधानांनी सांगितलं. 

१५ व्या 'मन की बात' च्या निमित्तानं पंतप्रधानांनी येत्या 26 जानेवारीला महापुरुषांच्या पुतळे आणि त्यांचा परिसर स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्याचं आवाहन केलं. १६ जानेवारीला देशात स्टर्ट अप इंडिया स्टॅँड अप इंडिया योजनेचा आराखडा मांडणार असल्याचीही घोषणा केली.