लाल दिवा हटवण्याच्या निर्णयानंतर मोदींनी केलंय हे मोठं विधान

केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवरुन लाल दिवा हटवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी सरकारकडून आज घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून केली जाणार आहे. 

Updated: Apr 19, 2017, 10:20 PM IST
लाल दिवा हटवण्याच्या निर्णयानंतर मोदींनी केलंय हे मोठं विधान title=

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवरुन लाल दिवा हटवण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी सरकारकडून आज घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी १ मे पासून केली जाणार आहे. 

या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फेसबुकवरुन मोठं विधान केलंय. त्यांनी फेसबुकवर असं म्हटलंय की, प्रत्येक भारतीय स्पेशल आहे. प्रत्येक भारतीय व्हीआयपी आहे. 

केंद्राने हा निर्णय जाहीर केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्वात आधी आपल्या गाडीवरुन लाल दिवा हटवला.

केंद्राच्या या निर्णयानंतर राज्यातही हा निर्णय स्वीकारण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच लाल दिवा वापरणं थाबवंलंय. त्यांच्यापाठोपाठ परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही लाल दिवा काढण्याचे आदेश दिले.