काँग्रेससमोर झुकले पंतप्रधान नरेंद्र मोदी

विरोधकांवर टीका करत पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी आज त्याच विरोधकांपुढे झुकतांना दिसले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत येताच जीएसटी बिल मंजूर व्हावं यासाठी विरोधकांपुढे झुकतांना दिसले.

Updated: Nov 27, 2015, 07:22 PM IST
काँग्रेससमोर झुकले पंतप्रधान नरेंद्र मोदी title=

नवी दिल्ली : विरोधकांवर टीका करत पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी आज त्याच विरोधकांपुढे झुकतांना दिसले. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत येताच जीएसटी बिल मंजूर व्हावं यासाठी विरोधकांपुढे झुकतांना दिसले.

राज्यसभेत प्रवेश करताच पंतप्रधान मोदी हे बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांना भेटले. त्याच्यासोबत काही वेळ चर्चा केल्यानंतर त्यांनी बसपाच्या इतर नेत्यांचीही भेट घेतली. त्यानंतर मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याजवळ गेले आणि त्यांचीही भेट घेतली.

काँग्रेसचे मोतीलाल वोरा, हनुमंत राव यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी जनता दल युनाईटेडचे अध्यक्ष शरद यादव यांच्याजवळ गेले आणि त्यांच्या सोबतही काही वेळ चर्चा केली. त्याआधी अरुण जेटलीही बराच वेळ विरोधकांसोबत चर्चा करतांना दिसले.

पंतप्रधान मोदींनी त्यानंतर सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना कामकाज सुरळीतपणे चालू देण्यासाठी आवाहन केलं. असं म्हटलं जातय की या सत्राची संपूर्ण जबाबदारी पंतप्रधानांनी स्वत: घेतली आहे. मागील अधिवेशनात अनेक विधेयक मंजूर करण्यात सरकारला अपयश आलं होतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.