नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा लखनऊमध्ये दसरा साजरा करणार आहेत. पंतप्रधान ११ ऑक्टोबरला लखनऊमध्ये उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान ऐशबागच्या विश्व प्रसिद्ध रामलीलामध्ये देखील सहभागी होणार आहेत. रावण दहनच्या कार्यक्रमासाठीही पंतप्रधान उपस्खित राहणार आहे.
पंतप्रधान यंदा दिल्लीतील रामलीलामध्ये सहभागी नाही होणार आहेत. नेहमी पंतप्रधान हे दिल्लीमधील कार्यक्रमातच सहभागी व्हायचे पण पहिल्यांदाच ते लखनऊमध्ये उपस्थित राहणार आहे. असं म्हटलं जात आहे की, पंतप्रधान दसऱ्याच्या दिवशी लखनऊमध्ये उपस्थित राहणं ही गोष्ट सांगते की भाजपने राममंदिराचा मुद्दा अजूनही सोडलेला नाही. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे देखील पारंपरिक उत्सव हे त्यांच्या मतदारसंघातच साजरे करत होते.