नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबमधल्या पठाणकोट इथल्या भारतीय वायूदलाच्या एअरबेसला भेट देणार आहेत. सकाळी अकरा वाजता नरेंद्र मोदी पठाणकोट एअरबेसवर पोहोचतील.
दोन जानेवारीला या एअरबेसवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. या हल्ल्यात सात जवान आणि अधिकारी शहीद झाले होते. त्यानंतर नुकतंच सुरक्षा दलांनी पंजाब पठाणकोटच्या विशाल वायुसेनेचं स्टेशन सुरक्षित म्हणून घोषित केलंय.
त्यानंतर आज तिथल्या परिस्थिताचा आणि सुरक्षाव्यवस्थेचा आढावा पंतप्रधान मोदी यावेळी घेणार आहेत. त्यानंतर शहिदांच्या कुटुंबियांचीदेखील ते भेट घेणार असल्याचं सांगण्यात येतंय.