माल्ल्या प्रकरणावर मोदींनी मौन सोडलं

श्रीमंतांना बँका लुटू देणार नाही, त्यांनी घेतलेली कर्जाची रक्कम परत करायला लावू असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. 

Updated: Mar 27, 2016, 05:19 PM IST
माल्ल्या प्रकरणावर मोदींनी मौन सोडलं title=

गुवाहाटी: श्रीमंतांना बँका लुटू देणार नाही, त्यांनी घेतलेली कर्जाची रक्कम परत करायला लावू असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. 

मद्यसम्राट विजय माल्ल्या हे 9 हजार कोटी रुपयांचं कर्ज बँकांकडून घेतलं आहे, हे कर्ज न फेडताच माल्ल्या विदेशामध्ये गेले आहेत. मोदी सरकारच्या मदतीमुळे माल्ल्या विदेशात गेल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. 

त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वक्तव्य केलं आहे. पंतप्रधानांनी थकबाकी वसूल करण्याचं आश्वासन दिलं आहे. मोदींनी माल्ल्यांबाबत हे अप्रत्यक्ष वक्तव्य केलं आहे. आसाममधील एका जाहीर सभेमध्ये मोदींनी माल्ल्या प्रकरणावर आपलं मौन सोडलं.