प्रसुतीवेदना सुरू झाल्यावर ६ किमी पायपीट

 मध्यप्रदेशात एका महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्यानंतर तब्बल 6 किलोमीटरची पायपीट करावी लागलीये... कारण फोन केल्यावर अनेक तास अँब्युलन्स पोहोचलीच नाही... इतकं चालल्यानंतर थोडं गाडीनं, थोडं होडीतून असं करत ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली... आता बाळ-बाळंतीण सुखरूप असले, तरी यामुळे व्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगली गेलीयेत... 

Updated: Aug 26, 2016, 10:30 PM IST
प्रसुतीवेदना सुरू झाल्यावर ६ किमी पायपीट title=

धत्तरपूर :  मध्यप्रदेशात एका महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्यानंतर तब्बल 6 किलोमीटरची पायपीट करावी लागलीये... कारण फोन केल्यावर अनेक तास अँब्युलन्स पोहोचलीच नाही... इतकं चालल्यानंतर थोडं गाडीनं, थोडं होडीतून असं करत ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली... आता बाळ-बाळंतीण सुखरूप असले, तरी यामुळे व्यवस्थेची लक्तरं वेशीला टांगली गेलीयेत... 

 
 काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये झळकलेला हा फोटो आहे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचा... पाण्यात पाय जाऊ नये, म्हणून पोलिसांनी त्यांना उचलून घेतलंय... 
 
 आणि या आहेत संध्या यादव... त्याच मध्यप्रदेशातल्या छत्तरपूर जिल्ह्यात बडामलहरा या गावातल्या... प्रसुतीवेदना सुरू झाल्यानंतर रुग्णालयात जाण्यासाठी तब्बल 6 किलोमीटर पाण्यातून चालत जावं लागलं त्यांना... शेवटी NDRFच्या जवानांनी नावेमध्येच तिची प्रसुती केली... 
 
 प्रसुतीवेदना सुरू झाल्यानंतर त्यांनी मध्य प्रदेश सरकारच्या बराच गाजावाजा झालेल्या जननी एक्सप्रेस या अॅम्ब्युलन्स सेवेला फोन केला... मात्र अनेक तास वाट पाहूनही शिवराजसिंगांची ही जननी एक्सप्रेस पोहोचलीच नाही... त्यामुळे वेदना होत असताना चिखल आणि् पाण्यातून तब्बल 6 किलोमीटर त्या चालत गेल्या... 
 
 मध्यप्रदेशात, त्यातही छत्तरपूरमध्ये पूरानं अनेक गावांना वेढा दिलाय... मात्र पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यात प्रशासनाला किती रस आहे, हे या एका घटनेनं सिद्ध केलंय... 
 
 एकीकडे पोलिसांच्या कडेवर बसणारे मुख्यमंत्री आणि दुसरीकडे 6 किलोमीटर पायी जाणारी गरोदर महिला... अच्छे दिन म्हणतात ते हेच का?