मुंबई : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात १५ दिवसांच्या आतच दुसऱ्यांदा पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत घट झालीय.
मंगळवारी पेट्रोलच्या किंमतीत ५० पैशांची तर डिझेलच्या किंमतीत ४६ पैशांची घट जाहीर करण्यात आलीय. नव्या किंमत मंगळवारी-बुधवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
त्यामुळे, घट झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल ६७.०५ पैसे प्रति लिटर तर डिझेल ५३.३२ पैसे प्रति लिटर होणार आहे.
यापूर्वी, १६ नोव्हेंबर रोजी पेट्रोलच्या किंमतीत ३६ पैशांनी तर डिझलच्या किंमतीत ८७ पैशांनी वाढ करण्यात आली होती.