मुंबई : जर तुम्ही खाजगी बॅंकेचे ग्राहक असाल तर एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन वित्तीय वर्षापासून वाढलेले बॅंक चार्जेस आपली वाट पाहत आहेत.
१ एप्रिलपासून आता तुम्हाला खात्यामध्ये किमान बॅलेंन्स न ठेवल्यास दंड भरावा लागणार आहे. त्याशिवाय तुम्ही जर चेकच्या ऐवजी ऑनलाईन बॅंकिगचा उपयोग केल्यास तुम्हाला अतिरिक्त चार्ज भरावा लागणार आहे.
HDFC बॅंक, ICICI बॅंक, अॅक्सिस बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक तसेच अनेक खाजगी बॅंकानी शुल्क वाढविण्याची घोषणा केली आहे.
बॅंक बॅलेंन्स किमान झाल्यास बॅंक तुम्हाला SMS किंवा ई-मेलद्वारा माहिती देणार आहेत. तसेच बॅंकाकडून निगेटिव्ह बॅलेंन्स दाखवण्यावर आता बंदी घालण्यात आली आहे.
निगेटिव्ह बॅलेंन्स दाखवण्याचा अर्थ असा होता की, जेव्हा ग्राहक खात्यावर पैसे जमा करेल तेव्हा दाखवलेला निगेटिव्ह बॅलेन्स एवढा शुल्क बॅंकेकडून कापून घेण्यात येईल.
आता पाहूया कोणती बॅंक किती शुल्क लावणार आहे-
१) HDFC बॅंक किमान बॅलेंन्ससाठी १५० ते ६०० रुपये दंड आकारणार आहे.
२) ICICI बॅंक शहरात आणि महानगरात किमान बॅलेन्ससाठी १०० रुपये दंड आकारणार आहे. मात्र ग्रामीण भागांना याबाबत सुट देण्यात आली आहे.
३)अॅक्सिस बॅंक किमान बॅलेंन्ससाठी कमीत ३५० रुपये दंड आकारणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.