नवी दिल्ली : पंजाबमधल्या नाफा तुरुंगातून पळून गेलेल्या खलिस्तान लिबरेशन फ्रंट या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हरमिंदरसिंग मिंटू याच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात सुरक्षा यंत्रणांना 24 तासांच्या आत यश आलं आहे.
मिंटूला काल रात्री दिल्लीच्या हसरत निजामुद्दीन स्थानकावर अटक करण्यात आली. तर या हल्ल्याचा मास्टरमाइंड परमिंदर ऊर्फ पेंदा यालाही उत्तर प्रदेशातून अटक झाली आहे. मिंटूसोबत पळून गेलेले अन्य अतिरेकी हे कर्नाल आणि पानिपतला गेल्याची कबुली पेंदानं दिली आहे.
या कबुलीमुळे मिंटूच्या फरार साथीदारांना शोधण्यासाठी या भागात व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून त्यांनाही लवकरच जेरबंद केलं जाईल, अशी शक्यता आहे. कालच्या हल्ल्यात आणखी 7 जण असल्याचंही परमिंदरनं कबूल केलं आहे.
जेलमधून पळालेला दहशतवादी हरमिंदरसिंगच्या मुसक्या आवळल्या